गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिंदेवाडी येथे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ठाकरे शिवसेनेच्या सहकार्याने भांडी संच वाटप उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मेढेवाडी येथील ३० बांधकाम कामगारांना सदर वाटप करण्यात आले. या भांडी संच मंजुरीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास सागर तोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मेघा पाटील, मनीषा पाटील, वैशाली बागडी, सुमन बागडी, संगीता पाटील, सारिका पाटकर, सरिता दळवी, रेखा कलावंत, श्रीदेवी गडकरी, विमल गडकरी उपस्थित होते.


