जळगावजवळ पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारलेल्या ११ प्रवाशांना दुसऱ्या रेल्वेने चिरडले
जळगाव : जळगावहुन मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्याने या रेल्वेतून खाली उडी मारलेल्या अकरा प्रवाशांना समोर येणाऱ्या दुसऱ्या रेल्वेने चिरडल्याची दुर्घटना घडली. जळगावमधील परधाडे स्टेशनजवळ हा भीषण अपघात घडला.
ही रेल्वेजळगावहून मुंबईकडे एक्सप्रेस निघाली होती. पोचाराजवळी परधाडे स्थानकाजवळ ट्रेन आली असता ब्रेक दाबल्यानंतर घर्षण होऊन ठिणग्या उडाल्या. हे बघून रेल्वेतील एका प्रवाशाने आग लागली असे सांगितल्याने काही प्रवाशांनी चैन ओढल्यानंतर रेल्वे थांबली. या आठवणीने डब्यातील काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. मात्र दुसऱ्या बाजुने कर्नाटकडे जाणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसखाली चिरडून या प्रवाशांचा मृत्यू झाला. रेल्वे प्रशासनही घटनास्थळी पोहोचलं असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

