Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बाल वयातच कुरआन समजला पाहिजे : मौलाना कासमी

हलकर्णीत ‘ जलसा’ उत्साहात


 

हलकर्णी : येथे मक्तब- ए- रहमानिया कडून आयोजित  जलसा तथा वार्षिक समारोहाच्या प्रसंगी इम्रान मीरा पानारी या यशस्वी विद्यार्थाचा प्रशस्तीपत्र देवून सन्मान करताना कोल्हापूर येथील मौलाना मन्सूर कासमी.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुले सुशिक्षित होतात मात्र संस्कारीत होत नाहीत  इस्लाम धर्माला लाभलेली दैवी असलेले कुरआन हे बाल मनात लवकर रुजवले गेले पाहिजे. जेणेकरून मुले संस्कारी होतील. त्यांच्यावर अन्य कोणत्याही वाईट गोष्टींचा प्रभाव पडणार नाही, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील मौलाना मन्सूर कासमी यांनी केले. 



हलकर्णीत मक्तब- ए- रहमानिया कडून आयोजित जलसा तथा वार्षिक समारोहाच्या प्रसंगी ते बोलत होते. प्रास्ताविकात  इरफान मकानदार यांनी मक्तब चे १४  वर्ष असून आज पर्यंत २०० च्या  आसपास मुलांनी  बाल वयातच कुरआन पूर्ण केल्याचे विशद केले. नियमित शालेय शिक्षण घेत अन्य वेळेत हे कुरआन  प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे समाजाने याचा लाभ घ्यावा असे आवाहनही मकानदार यांनी केले. 



यावेळी मुलांनी वर्षभर घेतलेल्या शिक्षणाचे प्रात्यक्षिक, योग्य उच्चारात कलमा पठण करून दाखवले. यावेळी घेतलेल्या स्पर्धा  व परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना कासमी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. समाजात असणाऱ्या कौटुंबिक समस्या याचे विनोदी सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन केले. आभार रहमान मकानदार यांनी मानले. यावेळी इस्माईल कादरभाई, नूर मकानदार, राज  खलिफा, इम्तियाज मुल्ला ,गुलाब मुल्ला, रियाज काझी, शब्बीर पानारी, मुस्तफा सकली, हसन ताशिलदार , जलसा कमिटीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. अरिफ चौगुले आणि फयाज ताशिलदार यांनी सूत्रसंचालन केले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.