Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूरचा सुपुत्र नेमबाज स्वप्निल कुसाळेला अर्जुन पुरस्कार तर प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर



नवी दिल्ली : भारत सरकारने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली असून यामध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळविणारा नेमबाज स्वप्निल कुसाळेला यंदाचा अर्जुन पुरस्कार तर प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरणाचा सोहळा १७ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. 



स्वप्नि कुसाळे हा कोल्हापूरचा सुपुत्र आहे. कांबळवाडी या छोट्या गावातील स्वप्निलने २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष गटातील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदक मिळवून महाराष्ट्राचे नाव पुन्हा उंचीवर नेले होते. खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा स्वप्निल हा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू आहे. त्याचबरोबर स्वप्निलच्या कोच दीपाली देशपांडे  द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 



त्याचबरोबर महाराष्ट्राचे सचिन सर्जेराव खिल्लारी यांनी पॅरा ऑलिम्पिकमधील एफ ४६ प्रकारात गोळाफेकीत रौप्य पदक पटकावले आहे. तर खेलरत्न पुरस्कार नेमबाज मनू भाकर, बुद्धिबळपटू डी. गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह, आणि पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीणकुमार यांना जाहीर झाला आहे. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर आणि २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात दोन कांस्यपदके जिकंली आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.