Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी येथे २३ ,२४,२५ रोजी पीर माॅसाबी उरुस



हलकर्णी (वार्ताहर) : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे  हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक पीर माॅसाबी उरूस गुरुवार दि. २३ ते शनिवार दि. २५ अखेर आयोजन करण्यात आले आहे.



गुरुवारी सायंकाळी ७ वाजता सार्वजनिक नालसाब दर्ग्यातून संधल मिरवणूक निघणार आहे. शुक्रवारी भर उरूस असून नैवेद्य ,लोटांगण कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी मेंढ्यांच्या टक्करी, बिनदाती बैलगाडी शर्यत, घोडा गाडी शर्यत, गावगणना बैलगाडी शर्यत, पाडा बैल शर्यत, जनरल दुबैली गाडी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. रात्री नऊ वाजता तौशिफ जुनैदी (पुणे )व इंतजार चिस्ती (भोपाल) यांच्या कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी सार्वजनिक नालसाब दर्ग्यातून गलेफ मिरवणूक निघणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.