खो-खो मध्ये मुलींचा संघ जिल्ह्यात प्रथम
गडहिंग्लज (प्रतिनिधी): राजर्षी शाहू विद्यानिकेतन शिंगणापूर, कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष शिक्षक क्रीडा स्पर्धेमध्ये गडहिंग्लज तालुक्यातील विद्यामंदिर खणदाळ शाळेने चमकदार कामगिरी केली. वरिष्ठ गट खो-खो मध्ये मुलींच्या संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविले.
तसेच वैयक्तिक स्पर्धेतील 600 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात पूर्वा चिरमुरे हिने प्रथम तर 400 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. प्रतीक्षा महेंद्र मगदूम हिने 400 मीटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांक तर ४ ×100 मी रिले धावणे या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धा पाहण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी खेळाडूंचे पालक उपस्थित होते.
खो-खो विजयी संघात पूर्वा चिरमुरे, विद्याश्री धनवडे, सेजल घोडके, सावित्री मोरे, मनुजा घोडके,श्रावणी जाधव, श्रृती पाटील, स्नेहा पाटील,प्रगती कोणूरी, प्रतिक्षा मगदूम, प्राजक्ता दळवाई,दिव्यांका कोणूरी यांचा तर रिले विजयी संघात पूर्वा चिरमुरे, विद्याश्री धनवडे, सेजल घोडके, श्रावणी जाधव,प्रतिक्षा मगदूम यांचा समावेश होता.
या सर्व खेळाडूंना रवि यरकदावर, अमित चव्हाण, मारूती कोलूनकर, मल्लिकार्जुन यादगुडी, युवराज भोसले, राजश्री मगदूम यांचे मार्गदर्शन तर केंद्रप्रमुख सुरेश हुली, मुख्याध्यापक श्रीकांत पोवार, शाळ व्यवस्थापन समिती, लक्ष्मी दूध संस्था, ग्रामपंचायत खणदाळ यांचे प्रोत्साहन लाभले. पार्वती फडतरे, वत्सला पाटील, रेखा नाईक, सुधा हुली यांचे विशेष सहकार्य लाभले.


