Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागाव येथे केदारी रेडेकर फौंडेशनकडून २६ जानेवारीला भव्य कबड्डी स्पर्धा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील कै केदारी रेडेकर फौंडेशन कबड्डी संघाच्या वतीने दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ३५ किलो गटातील भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे.



या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ३००१, २००१, १००१ रुपये अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई असे वैयक्तिक चषक देखील देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सहभागासाठी १५१ रुपये इतकी प्रवेश फी असून इच्छुकांनी राहुल चौगुले, साहिल भोसले, नंदकुमार कांबळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.  


या कबड्डी स्पर्धेच्या उदघाटनाप्रसंगी ग्रामविस्तार अधिकारी अर्जुन रेडेकर, शिवाजी कोंडुसकर, सुनील दासनहट्टी, राजेंद्र चिगरे, फत्तेसिंह देसाई, जयवंत सुतार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.