गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे आपले सरकार केंद्र ग्रामपंचायत कार्यालय येथे ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत मार्गदर्शन शिबिर पार पडले. दरम्यान, गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी या शिबिराला भेट देऊन मार्गदर्शन केले.
दरम्यान, हनुमान मंदिर येथे वास्तुशांती कार्यक्रमानिमित्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथे भेट देत तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी उपस्थित शेतकरी खातेदार व भाविकांना ॲग्री स्टॅक योजने बाबत माहिती सांगितली. यावेळी गडहिंग्लज मंडल अधिकारी राजू पाटील, गावचे इनामदार विरगोंडा देसाई, पोलीस पाटील उदय पुजारी, रवींद्र शेंडूरे, सुभाष चोथे, अनिकेत कोणकेरी, तलाठी सौ. रुपाली कांबळे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय वायदंडे, कोतवाल किरण कांबळे, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


