Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वडकशिवाले देवस्थान जमिनीवरील मालकी हक्कप्रकरणी आजऱ्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरु



आजरा : आजरा तहसील कार्यालय येथे अखिल भारतीय किसान सभा अंतर्गत देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू झाले आहे. वडकशिवाले येथील देवस्थान जमिनीवरील सातबारा पत्रकी मालकी हक्कातील नाव कमी करणे बाबत मालकाचे नाव इतर हक्कात घालणे बाबतच्या निर्णयाविरोधात हे बेमुदत आंदोलन सुरु झाले आहे.




या आंदोलनामध्ये किसान सभा देवस्थान जमीन धारक संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अमोल नाईक, उपाध्यक्ष बाळासाहेब कामते,  जिल्हा कमिटीचे सदस्य कॉम्रेड शिवाजी गुरव, गुरव समाज संघटनेचे गोविंद गुरव, हनुमंत गुरव, विशाल गुरव, कल्पना गुरव, संतोष गुरव- कांडगाव, विलास गुरव -चंदगड, जयवंत पाटील- किटवडे, विठ्ठल मुगुडकर- आरळगुंडी, तुकाराम गुरव- मसोली, कृष्णाथ गुरव- मुगळी, मारुती गुरव -चितळे, सूर्यकांत गुरव- कांडगाव, संजय गुरव- हरपवडे, विनायक पाटील- किटवडे यांचेसह देवस्थान जमीनधारक शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान, आंदोलकांशी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी चर्चा केली.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.