Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुंडगे येथे २७ जानेवारीला 'गाथा महाराष्ट्राची' कार्यक्रम

सनी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन 




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगे येथील सनी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २७ जानेवारी रोजी रात्री आठ वाजता  'गाथा महाराष्ट्राची' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. 



महाराष्ट्रातील संस्कृतीची परंपरा जपणारा, बळीराजाच्या व्यथा मांडणारा, भूपाळी ओव्या, भारुडे, पोवाडे, लोकगीते शिवराज्याभिषेक सोहळा तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा दाखवणारा हा बहारदार कार्यक्रम होणार आहे. आतापर्यंत या मंडळाकडून गावात वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, कपडे वाटप, भूकंपग्रस्तांना आर्थिक मदत, दुष्काळी भागात चारा वाटप, रक्तदान, आरोग्य शिबिर, एक गाव गणपती , शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सलग बारा वर्षे क्रिकेट सामन्याचे आयोजन, गावातील गुणवंतांचा गौरव, जयंती उत्सव असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेतले आहेत. यंदा मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 'गाथा महाराष्ट्राची' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.