Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बोरवेलच्या विद्युत कनेक्शनसाठी माजी सैनिक संभाजी कुरळे यांचे सोमवारपासून बेमुदत उपोषण

महावितरणच्या हलकर्णी येथील कार्यालयासमोर बसणार उपोषणास 




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बोरवेलसाठी विद्युत कनेक्शनची रीतसर मागणी करून देखील ११ महिने उलटले तरी कनेक्शन मिळत नसल्याने अखेर गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी येथील माजी सैनिक, अल्पभूधारक शेतकरी संभाजी कुरळे यांनी न्याय मिळण्यासाठी बेमुदत उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. दिनांक ६ जानेवारीपासून महावितरणच्या हलकर्णी कार्यालयासमोर ते उपोषणाला बसणार आहेत. 



माजी सैनिक संभाजी कुरळे यांनी तेरणी येथील गट नंबर ९३९ या  आपल्या २५ गुंठे जमिनीत साडेचार लाख रुपये खर्च करून बोरवेलची खुदाई केली आहे. पाणी उपशासाठी विद्युत कनेक्शन मिळावे यासाठी रीतसर महावितरण कार्यालयाकडे पैसे देखील भरले आहेत. मात्र ११ महिने उलटले तरी त्यांना विद्युत कनेक्शन मिळालेले नाही. डीपीवर लोड शिल्लक नसल्याचे कारण पुढे करून बोरवेलला कनेक्शन देता येणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले असून महावितरणकडून आता त्यांना सोलारचा पर्याय दिला आहे. मात्र श्री. कुरळे यांच्या बोरवेलची खोली सहाशे फूट खोल असल्याने सोलारने पाणी उपसा होईल का नाही ?  या प्रश्नाचे उत्तरच त्यांना मिळत नसल्याने शेतीकडे केवळ त्यांना बघत बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अखेर त्यांनी सोमवार दिनांक ६ जानेवारीपासून हलकर्णी येथील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.