Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'शिवराज’चा कर्मवीर गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रा.जयवंत पाटील यांना तर ‘कर्मवीर गुणवंत प्रशासकीय कर्मचारी’ पुरस्कार संदीप शिंदे यांना जाहीर

३१ जानेवारी रोजी होणार पुरस्कार वितरण सोहळा 



          प्रा. जयवंत पाटील                         संदीप शिंदे 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था व  शिवराज विद्या संकुल गडहिंग्लज  यांच्या वतीने देण्यात येणारा ‘कर्मवीर गुणवंत शिक्षक पुरस्कार क्रीडा शिक्षक प्रा. जयवंत पाटील यांना तर ‘कर्मवीर गुणवंत प्रशासकीय कर्मचारी पुरस्कार’  संदीप शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. सदरचा पुरस्कार वितरण सोहळा हा दि.३१जानेवारी रोजी सायंकाळी शिवराज विद्या संकुलाच्या प्रांगणात पाच वाजता संपन्न होत आहे.



या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे हे भूषविणार असून संस्थेचे उपाध्यक्ष के.जी.पाटील, जे.वाय.बारदेस्कर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. शाल, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे व प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.