Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीत दारासमोर लावलेली ओमनी पेटवण्याचा प्रयत्न ; अज्ञाताचे कृत्य

चप्पलला प्लास्टिक गुंडाळून टायरीखाली ठेवत आग लावण्याचा प्रकार 


टायर फुटल्याचा आवाज आल्याने मोठा अनर्थ टळला 





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी येथील किराणा व्यापारी व वृत्तपत्र विक्रेते सलीम जमादार यांच्या दारासमोर लावलेली मारुती ओमनी ही गाडी आज्ञातानी काल रात्री टायरीला आग लावून पेटवण्याचा प्रयत्न केला. टायर फुटलेला आवाज आल्यानंतर जमादार कुटुंबीयांनी धाव घेत टायरीला लावलेली आग विझवली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. 



याबाबतची अधिक माहिती अशी की, तेरणी येथील सलीम जमादार हे किराणा व्यापारी व वृत्तपत्र विक्रेते आहेत. गावातील बस स्टँड जवळ त्यांचे मोठे किराणा दुकान आहे. तर श्री महालक्ष्मी मंदिराजवळ त्यांचे घर असल्याने त्या ठिकाणी ते राहतात. या घरासमोर त्यांनी आपली ओमनी हे वाहन लावले होते. काल रात्री दीड ते दोनच्या सुमारास अज्ञाताने या गाडीच्या मागील टायरीखाली चप्पलला प्लास्टिक गुंडाळून आग लावली. टायर पेटल्यानंतर फुटून मोठा आवाज आल्याने जमादार कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने बाहेर येऊन पाहिलं असता टायरीला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही आग वेळीच विझवल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा पूर्ण वाहन जळून खाक झाले असते. अज्ञाताने सलीम जमादार यांचे नुकसान करण्याचे हेतूने केलेल्या कृत्याबद्दल ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.