Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आंबेओहोळ धरणग्रस्तांच्या पुनर्वसनप्रश्नी तातडीने बैठक बोलवा, अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन

धरणग्रस्त संग्राम संघटनेच्या वतीने गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन




गडहिंग्लज (प्रतिनिधी): आंबेओहोळ धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन करण्यासाठी बैठक बोलवा अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा धरणग्रस्त संघटनेच्या वतीने गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांना निवेदनातून दिला आहे. सदर निवेदन आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.



या निवेदनात म्हटले आहे की, आंबेओहोळ धरणग्रस्तांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. 100 धरणग्रस्तांचे संपूर्ण पुनर्वसन बाकी आहे. 60 धरणग्रस्तांचे अर्ध पुनर्वसन आहे, यामध्ये जमीन मागणारे धरणग्रस्त आहेत. काही धरणग्रस्तांना थोडी जमीन दिली आहे त्यांचे अर्धे पुनर्वसन झाले आहे. काही धरणग्रस्त शेतकऱ्यांना करार केले आहेत मात्र त्यांना पैसे मिळत नाहीत. काही धरणग्रस्तांना जमीन मिळाली, मात्र ती आठ किलोमीटरच्या बाहेर. राहत्या घरापासून त्यांना घर बांधणी भूखंड मिळालेला नाही. लिंगनूर येथील भूखंड शिल्लक असताना कडगाव येथील 18 नागरी सुविधा नसणारे भूखंड जबरदस्तीने गळ्यात मारण्याचा राजकीय डाव चालू आहे.



धरणग्रस्तांच्या मागणीप्रमाणे भूखंड मिळावा, तसेच बऱ्याच शेतकऱ्यांची दोनवेळा धरणासाठी जमीन संपादन केली आहे त्यांचे संकलन दुरुस्ती करून पुनर्वसन करावे, प्रत्येक गावात किमान 25 ते 30 शेतकरी पुनर्वसनापासून वंचित आहेत. जमिनी दिल्या पण त्यांच्यावर बेकायदा बोजा चढवलेला आहे तो कमी करावा,  नियमाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या गेलेल्या जमिनीची किंवा मिळालेल्या जमिनीची जी कमी असेल ती भोगवट्याची रक्कम शासनाकडे भरून घ्यावी लागते, मात्र गडहिंग्लज विभागात वेगळाच प्रकार घडला आहे; ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढवला आहे तो तात्काळ कमी करण्यात यावा,  धरणग्रस्तांना मिळालेल्या जमिनीच्या सातबारावर वर्ग एक करण्यात यावा,  काही शेतकऱ्यांचे धरणग्रस्त दाखले येज बारमुळे बदलून हवे आहेत ते मिळाले पाहिजे ते देण्यास टाळाटाळ होते. अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बैठक घेण्यात यावी व पुनर्वसन करावे अशी मागणी या निवेदनातून केली आहे. अन्यथा दिनांक 4 फेब्रुवारी पासून उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे. निवेदनावर शिवाजीराव गुरव, बाबुराव नाईक, सदू शिवणे, शंकर पुंडपळ, रोहिणी चौगुले, आनंदा गुरव आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.