Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजऱ्यातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेला ऑनलाईन भामट्यांकडून ३० लाखाचा गंडा

पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची खोटी माहिती फोनद्वारे देत भामट्यांनी फसविले 




आजरा : पोलिसात आपल्यावर गुन्हा नोंद झाला आहे अशी फोनद्वारे खोटी माहिती देत अज्ञात ऑनलाइन भामट्यानी आजऱ्यातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेला तीस लाख रुपयांचा गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे.



याबाबत मिळालेली माहिती अशी, आजरा येथील सेवानिवृत्त प्राध्यापिकेला २८ डिसेंबर २०२४ ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत फोनवरून अज्ञात व्यक्तीने आपल्यावर अंधेरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला आहे.  तसेच इतर खोटी माहिती दिली. यामुळे सेवानिवृत्त प्राध्यापिकेने विविध डिजिटल माध्यमातून अज्ञात व्यक्तीने सांगितलेल्या खात्यावर २९ लाख ९३ हजार १५० रुपये पाठविले. मात्र त्यानंतर संबंधित सेवानिवृत्त प्राध्यापिकेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आजरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सेवानिवृत्त प्राध्यापिकेची सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम मोबाईलचा वापर करून हडपण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.