Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एकपात्री अभिनयामध्ये दियाराणी कोरवी, आर्या करमळकर प्रथम

गडहिंग्लज कला अकादमीत पार पडल्या स्पर्धा


कै. रत्नमाला घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्य आयोजन 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): कै. रत्नमाला घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्य आयोजित करण्यात आलेल्या एकपात्री शालेय अभिनय स्पर्धेत लहान गटात दियाराणी कोरवी हिने तर मोठ्या गटात आर्या करमळकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत एकूण ४० स्पर्धेकांनी भाग घेतला होता.




गडहिंग्लज नगरपरिषद्, गडहिंग्लज कला अकादमी, जागृती हायस्कूल व कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्यावतीने  या स्पर्धा कला अकादमी येथे पार पडल्या. स्पर्धेचे उदघाटन डॉ. सतिश घाळी यांच्या हस्ते करण्यात आले. कला अकादमीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. रामय्या हिरेमठ यांनी आभार मानले. उर्मिला कदम यांनी सुत्रसंचालन केले. ॲड. बी. जी. भोसकी, ॲड. विकास पाटील, मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले, उपप्राचार्य विद्या पन्हाळे,  विभागप्रमुख स्वाती क्षीरसागर यांच्यासह अन्य उपस्थित होते.



लहान गटात प्रणिती देशपांडे हिने व्दितीय तर ऋचा कदम हिने तृतीय क्रमांक पटकावला. रचना माने हिला उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. मोठ्या गटात विभा शिंदे हिने व्दितीय तर समीर कांबळे याने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांना उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर यांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. परसु गावडे, मंदार बापट यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. 



या स्पर्धेसाठी वीरभद्र पत पेढ़ीचे नंदकुमार गुरव, सचिन मगदूम, निलेश शेलके, प्रभाकर दुंडगे, सुहास पुजारी,  संतोष बाबर यांचे विशेष सहकार्य मिळाले. दत्ता सुतार अरुण पाटिल, संतोष बोरनाक, विजय टेंबुकड़े, सोनम धनुकडे, मीनाक्षी टेंबुकडे, पुंडलिक परीट, प्रभाकर दुंडगे,  संतोष देसाई, एन. व्ही. गावडे, अशपाक मकानदार यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.