प्रा.शिवाजीराव होडगे प्रा. किरण भोई
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय महागावचे प्रा.शिवाजीराव होडगे, सरचिटणीसपदी गडहिंग्लज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्रा. किरण भोई तर उपाध्यक्षपदी एम.आर.हायस्कूल व जुनियर कॉलेजचे प्राचार्य संजय कुंभार यांची निवड करण्यात आली. तालुका कार्यकारिणीची सभा शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज येथे संपन्न झाली. अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष प्रा.मधुकर शिंदे होते.
मागील कार्यकारणीतील पदाधिकारी सेवानिवृत्त झाल्याने नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला उपाध्यक्ष प्रा. संजय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्राचार्य इनास कुटीन्हो यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले. सभेत सर्वानुमते निवडी करण्यात आल्या.
या सभेसाठी उपाध्यक्षा प्रा. बिनादेवी कुराडे, कोषाध्यक्ष मारुती कांबळे , सदस्य व्ही.के.चव्हाण, आय.टी.नाईक,अजित कुलकर्णी, सोमनाथ खानापुरे, मुकुंद मांडरे, स्मिता देसाई, शिवाजी आंबुलकर, उषा नाईक ,सारिका बटकडली, अफसाना गवंडी , निर्मला नेसरकर यांच्यासह तालुक्यातील सर्व ज्युनिअर कॉलेजचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रा. संतोष पाटील यांनी आभार मानले.


