Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला विहिरीच्या काठावर महिलेचा मृतदेह ; घातपाताचा संशय

अंगावरील दागिने गायब; पोलिसांचा गतीने तपास सुरू 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथे मेटाचा मार्गातून शेंद्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका विहिरीच्या काठावर शोभा सदाशिव धनवडे (वय ६२ ) या महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या अंगावरील दागिनेही गायब असल्याने घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गडहिंग्लज पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत गतीने तपास सुरू केला असून पोलीस तपासानंतरच नेमके सत्य करणार आहे. 


शोभा धनवडे या काल सायंकाळी चार वाजल्यापासून घरातून बाहेर गेल्या होत्या त्या अद्याप सापडल्या नव्हत्या. दरम्यान, आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास विहिरीच्या काठावर त्यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. अंगावरील दागिने देखील गायब असल्याने लूटमारीच्या उद्देशाने त्यांचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आले असून पोलिसांकडून गतीने तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.