Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला दादा जे. एम. ग्रुपतर्फे मान्यवरांचा सत्कार

कु. सुकन्या शिवणे, कु. मीनल मकानदार, दादामियाँ कापसे,  रामगोंडा उर्फ गुंडू पाटील यांचा समावेश 


                                                   छायाचित्र: मजीद किल्लेदार 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील दादा जे. एम. ग्रुप तर्फे गडहिंग्लज शहरातील मान्यवरांचा सत्कार समारंभ मकानदार मोहल्ला येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साधना शिक्षण समूहाचे प्रमुख जे बी बारदेस्कर होते. 




यावेळी रांची (झारखंड) येथे झालेल्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत देशात तिसरा क्रमांक मिळवलेली कु. सुकन्या शिवणे, जयपूर (राजस्थान) येथे झालेल्या आंतर भारतीय आंतर विद्यापीठ नेट बॉल स्पर्धेत घवघवीत यश मिळविलेली कु. मीनल मकानदार, पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले दादामियाँ कापसे आणि वाढदिवसानिमित्त सामाजिक व राजकीय कार्यकर्ते रामगोंडा उर्फ गुंडू पाटील यांचा शाल, श्रीफळ, बुके देऊन सत्कार जे. बी. बारदेस्कर, माजी नगराध्यक्ष राजू खणगावे, उद्योजक रेहमान नाईकवाडे, माजी नगरसेवक हारूण सय्यद यांचे हस्ते करण्यात आला.



याप्रसंगी बोलताना श्री. बारदेस्कर म्हणाले,  सध्याच्या द्वेषाच्या वातावरणात सर्व जाती धर्मातील प्रेमाचे, सलोख्याचे संबंध वाढले पाहिजेत. जात, धर्म या पलीकडे माणुसकीचा धर्म आहे. मानवतेच्या उदात्त भावनेतून मुस्लिम बांधवांनी गुणीजनांचा केलेला सन्मान हे हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. गुणीजनांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे यासाठी शिक्षणाला अधिक महत्त्व देऊन मिळालेल्या क्षेत्रात नावलौकिक केला पाहिजे.



स्वागत व प्रास्ताविक प्रा. आशपाक मकानदार यांनी केले. या कार्यक्रमास आप्पा शिवणे, प्रेसिडेंट मंजूर मकानदार, हाजी घडूलाल शेख, राजू जमादार, नवाब मालदार, जावेद वुडेखान, रमजान मकानदार, नदीम बाबा शेख, जावेद मकानदार, मुस्ताक मुल्ला, अलताप शानेदिवाण, मजीद किल्लेदार, आशगर मकानदार, निसार मुल्ला, शब्बीर मकानदार, नूर अत्तार, मुनीर मकानदार, अमिरअली मुजावर यांचे सह मान्यवर व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार युनूस नाईकवाडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.