Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीने गळफास लावून घेत संपविले जीवन

भडगाव पुलाजवळील करंजीच्या झाडाला ओढणीच्या साह्याने लावून घेतला गळफास 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव पुलानजीक असणाऱ्या करंजीच्या झाडाला गीता रामाप्पा केसरकर ( वय १५, राहणार भडगाव ) या इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलीने ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. वडील रामाप्पा कल्लाप्पा केसरकर (वय ४३) यांनी याबाबतची वर्दी गडहिंग्लज पोलिसात दिली आहे. 



याबाबत पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत गीता ही चन्नेकुपी येथील एका शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती. तिचे वडील गवंडीकाम तर आई मोलमजुरी करते. रविवारी नेहमीप्रमाणे वडील गवंडी कामासाठी तर आई शेतकामासाठी घरातून बाहेर गेले होते. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने  मुलगा एका लग्न समारंभासाठी गेला होता. त्यामुळे घरात गीता ही एकटीच होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आई शेतातून घरी आल्यानंतर गीता घरात दिसली नाही. बाहेर गेलेला मुलगा घरी आल्यानंतर गीता बाबत आईने चौकशी केली मात्र त्यानेही माहीत नसल्याचे सांगितले. याबाबत गवंडी कामावर गेलेले पती रामाप्पा यांना देखील फोन करून याबाबत कल्पना देण्यात आल्याने ते देखील तातडीने घरी आले. शेजारी, नातेवाईक, मैत्रिणी व शिक्षकांकडे गीताबाबत चौकशी करण्यात आली. मात्र तेथेही ती नसल्याचे सांगण्यात आले. शोधाशोध करून देखील ती सापडत नसल्याने अखेर गडहिंग्लज पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली. तक्रार नोंदवून घरी येत असताना भडगाव पुलाजवळ एक बॅग व त्याच्या शेजारी सॅंडल पडलेले दिसून आले. जवळ जाऊन पाहिले असता या वस्तू गीताच्याच असल्याची खात्री झाली. आजूबाजूला शोध घेतला असता पुलाजवळील करंजीच्या झाडाला ओढणीच्या साह्याने गीताने गळफास लावून घेतल्याचे दिसले. याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.