कोल्हापूर : नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास, औकाफ राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यानंतर कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी पुष्प अर्पण केले. यावेळी आमदार शिवाजी पाटील, कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, समाज कल्याण सहायक आयुक्त सचिन साळे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे आदी मान्यवर उपस्थित होते.


