Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात विविध गुणदर्शनाचा बहारदार कार्यक्रम उत्साहात



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शिवराज  महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित विविध गुणदर्शनाचा बहारदार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.



या कार्यक्रमाचे उदघाटन गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे व वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. संदीप फगरे यांची उपस्थिती लाभली. ॲड. दिग्विजय कुराडे व प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात प्रारंभी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.रवि खोत यांनी स्वागत केले.




या कार्यक्रमात उदघाटनप्रसंगी पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला शांततेने सहकार्य करावे. कलागुणांचा हा कार्यक्रम यशस्वी करून महाविद्यालयाची परंपरा जोपासावी असे आवाहन केले. यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे व वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड. संदीप फगरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी शिवराज महाविद्यालयाच्या यशस्वी परंपरेचे पाईक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी या बहारदार कार्यक्रमाला शांततेचे सहकार्य दिल्यास हा कार्यक्रम अधिक चांगला होईल असा विश्वास व्यक्त करून विद्यार्थ्यांनी कलेची परंपरा समृद्ध करावी असे आवाहन केले. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी कलाकारांनी हिंदी, मराठी, कन्नड गीतांची गायनातून बरसात  केली तसेच व देशभक्ती, लावणी, जोगवा, गोंधळ, महाराष्ट्रीय लोक परंपरा, लोकसंस्कृतीचे दर्शन घडवत व हिंदी, मराठी, रिमिक्स गाण्याच्या तालावर थिरकत बहारदार नृत्याचा अविष्कार करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.




या कार्यक्रमास शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, उपाध्यक्ष जे.वाय.बारदेस्कर, संस्थेचे पदाधिकारी के. बी.पेडणेकर, बसवराज आजरी, प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, प्रा.विश्वजित कुराडे, यांच्यासह संस्थेचे अन्य मान्यवर, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, स्नेहसंमेलन प्रमुख श्री के.टी.कुंभार, संस्थेचे अन्य मान्यवर, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.रवि खोत, प्रा.डी.यु.जाधव, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, प्रा.एम.एस.घस्ती, डॉ.बी.एम.जाधव, प्रा.पौर्णिमा पाटील, सौ.श्रद्धा चौगुले, प्रा.डी.आर. बेलेकर, प्रा.धनश्री लोंढे. प्रा.सुप्रिया निकम, प्रा.अमिता गोणी, प्रा.रोहिणी नाईक, प्रा.अनिता पोवार, प्रा.प्राजक्ता जाधव, प्रा.स्वप्नील आर्दाळकर, श्री सचिन काटे यांच्यासह अन्य प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.