Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात ‘परिस स्पर्श योजना व न्यु नॅक रिफॉर्म्स’या विषयावर कार्यशाळा संपन्न



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील शिवराज महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘परिस स्पर्श योजना व न्यु नॅक रिफॉर्म्स’ या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे होते. 



प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रारंभी या कार्यशाळेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी घालून करण्यात आले. महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्रा.किशोर अदाटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी सोमया विद्याविहार विद्यापीठ मुंबईचे सायन्स विभागचे अधिष्ठाता डॉ.नितीन देसाई यांनी ‘ट्रान्सलेशन रिसर्च अँड न्यू इंडिया’ या विषयावर विशेष मार्गदर्शन केले.



या कार्यशाळेमध्ये सकाळच्या उदघाटन सत्रामध्ये  लर्नकोच ठाणेचे संस्थापक व सी.ई.ओ. श्री मनीष तिवारी यांनी डिजिटल ‘रोल ऑफ ए.आय.इन हायर एज्युकेशन’ व लर्नकोचचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री जयदीप शर्मा ‘लर्नकोच सॉफ्टवेअर’ बाबत सविस्तर माहिती दिली. आदी मान्यवरांनी विशेष मार्गदर्शन केले. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे यांनी नॅक मुल्यांकन होणे काळाची गरज आहे. नॅक मुल्यांकनास सामोरे जाने गरजेचे आहे. त्यामुळे शैक्षणिक बदल होतो असे नाही तर संस्थात्मक बदल होत असतो. हा बदल स्वीकारून आम्ही  नॅक मुल्यांकनात यशस्वी झालो असल्याचे त्यांनी  स्पष्ट  केले.


दुपारच्या सत्रात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील आय.क्यू.ए.सी.विभागाचे संचालक डॉ.एस.डी.डेळेकर यांनी न्यू.नॅक रिफॉर्म याबाबत’ तसेच शिवाजी विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाचे डॉ.जी.बी.कोळेकर यांनी ‘बायनरी ॲक्रीडेशन’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.




अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी जीवनात अत्यंत आवश्यक असणाऱ्या शिक्षणाचा समावेश होणे काळाची गरज आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने विद्यार्थी हिताचा व कल्याणाचा आहे त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे तरच महाविद्यालयांनी समाजाच्या हिताची दाखल घेतल्याचे समाधान खऱ्याअर्थी प्राप्त होईल असे त्यांनी स्पष्ट केले.


या कार्यशाळेसाठी संस्थेच्या संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.राहुल जाधव, प्राचार्य डॉ.संभाजी भांबर, प्राचार्य डॉ. दत्ता पाटील, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.ए.एम.हसुरे यांच्यासह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य व आय.क्यू.ए.सी. समन्वयक उपस्थित होते. या संपूर्ण कार्यशाळेचे संयोजन संचालक प्रा.विश्वजित कुराडे व आय.क्यू.ए.सी. विभागाने केले. सूत्रसंचालन डॉ.अल्ताफहुसेन नाईकवाडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.