Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूरच्या न्यू वुमन्स फार्मसीमध्ये जागतिक मातृभाषा दिन उत्साहात

निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

          



कोल्हापूर : येथील श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित,न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये जागतिक  मातृभाषा दिन उत्साहात संपन्न झाला.




भाषा हा संवादाचा पाया आहे. प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी एकमेकांच्या भाषेचा आदर करणे, तिचा स्वीकार करणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे. हे जग भाषा, संस्कृती आणि परंपरांनी भरलेले आहे. बोलीभाषेतही प्रत्येक भाषा वेगवेगळी असते. दर काही किलोमीटरने बोलीभाषा बदलतात आणि भाषा बदलू लागते. हे थोडे कन्फ्युजिंग वाटत असले तरी  जगातील विविधतेचे सौंदर्या आणि एकमेकांशी सहकार्य आणि कनेक्ट होण्याचे मार्ग शोधणे हे महत्त्वाचे आहे. देशभरात बोलल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या बोलीभाषामुळे भारत जगासाठी भाषिक आणि संस्कृतीक विविधतेचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून न्यू वुमन्स  फार्मसीमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.



स्पर्धेला विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त  प्रतिसाद दिला. यावेळी झालेल्या स्पर्धेमध्ये कु.सेलिना नादारने प्रथम तर कु.मधुरा शिंदे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा.सविता म्हाळुंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदरचा उपक्रम कॉलेजचे प्राचार्य डॉ.रवींद्र कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी प्रा. पियुषा नेजदार, प्रा. दिव्या शिर्के, प्रा. निकिता शेटे, प्रा.रुचा अष्टेकर व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.