Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

छावा चित्रपट करमुक्त करा- काशिनाथ गडकरी

गडहिंग्लजला न्यू युवा मंचच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन




गडहिंग्लज (प्रतिनिधी): छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा व स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचा इतिहास सांगणारा छावा चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी न्यू युवामंचच्या वतीने प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन मंचचे शहराध्यक्ष काशिनाथ गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.


अभिनेता विकी कौशल, अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना, लक्ष्मण उतेकर यांनी छावा चित्रपटात उत्कृष्ट भूमिका बजावल्या आहेत. या चित्रपटात त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा व स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचा इतिहास दाखविला आहे. गडहिंग्लज येथील चित्रपटगृहात देखील गेले आठ दिवस झाले हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र तिकिटाचा दर  शंभर ते दीडशे रुपये पर्यंत आहे. त्यामुळे हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी या निवेदनातून केली आहे.



यावेळी काशिनाथ गडकरी, लक्ष्मण पाचापुरे, किशोर चौगुले, राहुल आरबोळे, बाळू पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.