Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पथ विक्रेत्यांना त्रास होणार नाही, वाहतुकीला अडथळा येणार नाही याची खबरदारी घेतली जाणार!

'हॉकर्स पॉलिसी' अंमलबजावणीसाठी प्रक्रिया सुरू 


156 नगरपालिकांचे अधिसूचनेसाठी प्रस्ताव प्राप्त


राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती





मुंबई  :  हॉकर्स पॉलिसी प्रभावीपणे लागू करण्याची प्रक्रिया सुरू असून नियोजन करताना पथ विक्रेत्यांना त्रास होणार नाही आणि वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार असल्याचे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.




राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, 156 नगरपालिकांचे अधिसूचनेसाठी प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातील तीन प्रस्ताव पुढे पाठवण्यात आले आहेत.


विधानपरिषद सदस्य सर्वश्री सत्यजीत तांबे, भाई जगताप यांनी राज्यातील सर्व लहान व मोठ्या शहरातील फेरीवाल्यासंदर्भातील प्रश्न मांडला होता, त्यावर राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी उत्तर दिले.


उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि 2017 च्या शासन निर्णयानुसार, पथविक्रेता धोरण अंमलबजावणीसाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. या प्रक्रियेनुसार, 408 नगरपालिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यानुसार 4 लाख 35 हजार 586 पथविक्रेते आहे. मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये सन 2014 मध्ये फेरिवाल्याच्या सर्वेक्षणादरम्यान  1 लाख 28 हजार 443 अर्ज वितरित होऊन त्यापैकी 99 हजार 435 अर्ज मुंबई महापालिकेस सादर झालेले आहेत. त्यापैकी 22 हजार 55 अर्जदार व 10 हजार 360 परवानाधारक असे एकूण 32 हजार 415 मतदार म्हणून पात्र आहेत. तथापि, सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमुळे मतमोतणी व निकाल करता आले नाही. त्यामुळे नगर पथविक्रेता समिती व परिमंडळीय नगर पथविक्रेता समित्या गठीत झाल्या नाहीत. यासंदर्भात न्यायालयाकडून अंतिम निर्णय झाल्यास पथविक्रेते आणि दुकानदार यांच्यात समन्वय साधला जाईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.