Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज इंग्लिश मीडियम स्कूल, शिवाजी विद्यालय उपांत्य फेरीत

गडहिंग्लजला टिसीजी- युनायटेड ब्लू कब फुटबॉल लीग


काळू मास्तर विद्यालय, साधना हायस्कूलही पात्र





गडहिंग्लज (प्रतिनिधी):  येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि टँलेन्ट कन्सोल ग्लोबल फौंडेशन (टिसीजी) मार्फत सुरु असणा-या ब्लू कब फुटबॉल लीगमध्ये शिवराज इंग्लीश मिडियम स्कूलने सर्वाधिक १३ गुणासह उपांत्य फेरी गाठली. छत्रपती शिवाजी विद्यालय ( १० गुण), साधना हायस्कूल ( ९) आणि काळू मास्तर विद्यालय ( ६) हे संघही पात्र ठरले. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.



बारा वर्षाखालील गटात एकुण सहा संघ सहभागी होते. साखळी पध्दतीने १५ सामने खेळविण्यात आले. यात शिवराज स्कूलने चार विजय आणि एक बरोबरीसह सर्वाधिक १३ गुण मिळवून गुणतक्क्यात अव्वल स्थान पटकाविले. शिवाजी विद्यालयाला तीन विजय, एक बरोबरी आणि एक पराजयामुळे १० गुणासह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. साधना हायस्कूल दोन विजय आणि तीन बरोबरीमुळे ९ गुणासह तिसऱ्या स्थानावर राहिला.



गत उपविजेता काळू मास्तर विद्यालय दोन विजय, एक बरोबरी आणि दोन पराजयामुळे पाच गुणासह चौथ्या स्थानावर राहिला. सर्वोदया स्कूल दोन गुणासह पाचव्या तर एम. आर. हायस्कूल १ गुणासह सहाव्या क्रमांकावर राहिला. पहिला उपांत्य  सामना शिवराज विरूध्द साधना हायस्कूल तर दुसरा सामना शिवाजी विद्यालय विरूध्द काळू मास्तर विदयालय यांच्यात होईल. स्पर्धेचे यंदाचे सातवे वर्ष असून विजेतेपद कोण पटकाविणार याची उत्कंठा नवोदित खेळाडूंना लागून राहिली आहे.


शनिवारी उपांत्य तर रविवारी अंतिम सामना


शनिवारी सायंकाळी साडे चार वाजता  उपांत्य फेरीच्या सामन्यांना प्रारंभ होईल. दोन उपांत्य फेरीचे सामने आहेत. रविवारी सायंकाळी साडे चार वाजता अंतिम सामना होईल. त्यानंतर स्पर्धेचा पारितोषिक वितरण होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.