Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला शनिवारपासून टीसीजी - युनायटेड ब्लू कब लीग

युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजन 


आठ, दहा आणि बारा वर्षाखालील फुटबॉलपटूंना संधी         




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि टँलेंन्ट कन्सोल ग्लोबल फौंडेशनमार्फत (टिसीजी) ब्लू कब फुटबॉल लीग स्पर्धा होणार आहे. शनिवारपासून (ता.८) रोज सांयकाळी पाच वाजता एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर हि स्पर्धा होईल. स्पर्धेत आठ, दहा आणि बारा वर्षाखालील अशा तीन गटात ही लीग आहे. स्पर्धेचे यंदाचे सातवे वर्ष आहे.



                                                                                                                     

प्राथमिक स्तरातील विद्यार्थ्यांना फुटबॉलची आवड निर्माण व्हावी यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. खासकरून फुटबॉलच्या माध्यमातून लहान मुलांत मैदानी खेळाची गोडी लागावी यासाठी गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत हा उपक्रम राबवला जातो. फुटबॉलचा दर्जा वाढवण्यासाठी खेळाडूंची संख्यात्मक वाढ गरजेची असून त्यासाठी जागतिक फुटबॉलमहासंघाने (फिफा) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) नवोदितांसाठी स्पर्धाघेण्याच्या सुचना आहेत. त्या धर्तीवर गेल्या सहा वर्षापासून हि स्पर्धा होत आहे.स्पर्धा समन्वयक अनिकेत कोले, दत्ता चव्हाण आणि सहकारी स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.



                                                                                                                   

नवोदित खेळाडूंची कमी शारीरिक क्षमता लक्षात घेऊन मैदानाची आकार कमी करण्यात आला आहे. सेव्हन साईटपध्दतीने एकाचवेळी दोन मैदानावर सामने होतील. साखळी पध्दतीमुळे खेळाडूंना अधिकसामने खेळायला मिळणार आहेत. आठ, दहा आणि बारा वर्षाखालील असे तीन गट आहेत. आठवर्षे गटासाठी सन २०१७-२०१८, दहासाठी सन २०१५- २०१६ तर बाराला २०१३-२०१४ अशी जन्मतारखेचीअट आहे. विजेत्या आणि उपविजेत्या संघाना टिसीजी- युनायटेड करंडकासह किट दिले जाणारआहे. तरी नवोदितांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युनायटेडचे अध्यक्ष डॉ रविंद्र हत्तरकी, उपाध्यक्ष सुरेश कोळकी, टिसीजीचे अध्यक्ष प्रा. प्रमोद इंचनाळकर, उपाध्यक्ष गंगाराम नाईक यांनी केले आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.