Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालय ‘ग्रीन कॉलेज व क्लीन कॉलेज’ राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
किर्लोस्कर वसुंधरा आयोजित ‘ग्रीन कॉलेज व क्लीन कॉलेज’ या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये येथील शिवराज महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला., पुणे येथील पी. वाय. सी. हिंदू जिमखाना येथे आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयास अभिनेते मोहन आगाशे व अभिनेत्री मृणालिनी कुलकर्णी, किर्लोस्कर वसुंधराचे अध्यक्ष आर.आर.देशपांडे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकांचे चषक, मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतातील दीडशेहून अधिक  महाविद्यालयाने सहभाग घेतला होता.


या स्पर्धेत शिवराज महाविद्यालयाने दोनवेळा आपली चमक दाखविली आहे. २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात प्रथम तर राज्यात व्दितीय क्रमांकाचे विजेतेपद पटकाविले होते. पर्यावरण शाश्वत विकास, आरोग्य व स्वच्छता या मुख्य घटकांचा समावेश या स्पर्धेत होता. या संपूर्ण घटकांचा उपयोग समाजाला व नव्या पिढीमध्ये जनजागृती व्हावी हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. श्रुती सावंत, श्रेयस शिऊडकर, माहीन पठाण या विद्यार्थ्यांनी या संदर्भात आवश्यक ती माहिती पॉवर पाँइटव्दारे सादर केले.



या स्पर्धेसाठी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन तर नॅक समन्वयक प्रा.किशोर अदाटे, डॉ.विद्या देशमुख, प्रा.तंझीला काझी, प्रा.विश्वजित कुराडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.