रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजन ; हिंदू-मुस्लीम ऐक्याचा दिला संदेश
गडहिंग्लज (प्रतिनिध) : जगभरातील मुस्लिम बांधवांचा उपवासाचा पवित्र महिना म्हणून ओळखला जाणाऱ्या रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज येथील तेरणी येथे मुस्लिम बांधवांसाठी जामा मस्जिद येथे मराठा समाजाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
रमजान महिन्यात मुस्लिम बांधव पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. रात्रीच्या जेवणाला इफ्तार म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर तेरणीतील मराठा समाजाच्या वतीने जामा मस्जिद येथे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी पार पडली. हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांसमवेत फलाहार करत एकमेकांशी हितगुज साधून हिंदू- मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला.
यावेळी माजी सरपंच व विद्यमान सदस्य करवीर उथळे, दूंडाप्पा इंगवले, बाळासाहेब निंबाळकर, महादेव तेगनाळे, राजू इंगवले, भूषणबाबू इंगवले, मारुती मांगले, बसवंत फडके, संतोष इंगवले, सिद्धाप्पा धनगर, शिवाजी जाधव, माजी सरपंच व विद्यमान सदस्य मोसिम मुल्ला, गुलाब मुल्ला, रमजान अंकली, कुतुबुद्दीन साबखान, शब्बीर कंगणी, शब्बीर साबखान, दिलावर सबखान, जब्बार मुल्ला, इब्राहिम नरगड्डी, हसन अंकली, राजू गंधनवाले यांच्यासह मुस्लिम व हिंदू बांधव उपस्थित होते. स्वागत रमजान अंकली यांनी केले.

.jpg)

