गडहिंग्लज (प्रतिनिध): आरोग्य विभाग, ग्रामपंचायत यांच्या वतीने विद्यामंदिर गांधीनगर शाळेत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण जनजागृती करण्यात आली. प्रभातफेरी काढण्यात आली. टी. बी. निवारण दिनानिमित्त चित्रकला, रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
या स्पर्धेचा निकाल असा- रांगोळी स्पर्धा : प्रथम वैजयंती माने, द्वितीय: साजरा तेरणी, तृतीय: गौरी शिर्के. चित्रकला स्पर्धा: प्रथम उमेर यमकनमर्डी, द्वितीय समर्थ बोगरनाळ, तृतीय समर्थ धनगर. दरम्यान, शंभर दिवशीय क्षयरोग मोहीम अंतर्गत उपकेंद्रामध्ये किशोरवयीन मुलींच्या साठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये प्रथम वैष्णवी रामाजीगोळ, सृष्टी कोळी, द्वितीय प्रेरणा मऱ्यापगोळ, तृतीय संस्कृती खवणेवाडी यांनी यश मिळवले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी नीलिमा धबाले, सरपंच योगिता संगाज, पर्यवेक्षक बाळासाहेब कुंभार, आरोग्य सेविका राजश्री सूर्यवंशी, परमेश्वर गायकवाड, वीणा पाटोळे, अश्विनी हसुरकर, आशा वर्कर्स संगीता नाईक, भारती पाटील, शिरीन कादरभाई, जयश्री मऱ्यापगोळ, माया पाटील, राजश्री भोसले, अंबिका चीकबसर्गे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.






