Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समाजाला वैचारिक प्रदूषणाचा धोका ; हे थांबविण्याचे काम तरुणाईने करावे : एन.डी.कुराडे

गडहिंग्लज येथील कै. दिनकरराव शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात पारितोषिक वितरण कार्यक्रम





गडहिंग्लज (प्रतिनिधी): 'यथा राजा तथा प्रजा' या उक्तीप्रमाणे देशाच्या राज्यकर्त्यांचे राजकारण ज्या दिशेने चालते त्याच दिशेने समाज चालत रहातो. सध्याच्या काळात देशाचे आणि महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्या वळणावर असून भूतपूर्व राष्ट्रीय नेत्यांचे विचार संपवण्याचे प्रयत्न होत आहेत. राज्यात पक्षफुटीचे दूरगामी परिणाम होत असून सूडाच्या राजकारणाने कळस गाठला आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा न करता नेतेही परस्परांचे वाभाडे काढण्यात मश्गूल आहेत.त्यामुळे समाजाचे नुकसान होत असून वैचारिक प्रदूषण वाढत आहे. हे थांबण्याचे काम तरूणाईला करावे लागणार असून तरूणांनी थोरांच्या चरित्रांचे वाचन व त्यांच्या विचारांचा जागर केला पाहिजे असे विचार नूल येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे सेवानिवृत्त शिक्षक एन. डी.कुराडे यांनी व्यक्त केले.




गडहिंग्लज येथील कै. दिनकरराव के. शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालय आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. प्राचार्य डाॅ.एस. एम. रायकर अध्यक्षस्थानी होते.




प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शैक्षणिक वर्ष 2021ते 23चे गुणानुक्रमे विद्यार्थी-सोनल गिलबिले,ओंकार पाटील,श्वेता मगदूम, समिक्षा पालकर, कादंबरी पाटील व आशा गडकरी (आदर्श विद्यार्थिनी) 2022ते 2024चे गुणानुक्रमे विद्यार्थी-शुभांगी पाटील, सुवर्णा कुंभार, शितल पाटील,अनघा कांबळे,हर्षाली कोंडूसकर व नारायण पवार (आदर्श विद्यार्थी) यांच्यासह क्रिडा-स्पर्धेतील यशस्वीतांचा रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. शुभांगी पाटील, सुवर्णा कुंभार रोहिणी करडे यांनी मनोगत व्यक्त केले.



अध्यक्षीय भाषणात डाॅ.रायकर यांनी जीवनात यश संपादन करायचे असेल तर कठोर परिश्रमास पर्याय नाही या शिकवणीप्रमाणे महाविद्यालयाची वाटचाल सुरू असून संस्थेचे संस्थापक कै.डाॅ. ए.डी.शिंदे व अध्यक्ष कै.श्रीपतराव शिंदे यांचे नाव आणखी उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी झटले पाहिजे असे आवाहन केले. विमल गावडे यांनी स्वागत,वैशाली दावणे यांनी प्रास्ताविक,दीपा कानडे यांनी सूत्रसंचालन तर भारती कुंभार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डाॅ.सौ.टी.वाय. पटेल, प्रा.सौ.एस्.जे. घाटगे,प्रा.एस.एस.जाधव, प्रा. व्ही. बी.मगदूम, ग्रंथपाल सौ. मंगल कापसे, लिपीक- शिवाजी नाईक व चौगुले यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, प्रशिक्षणार्थी व पालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.