Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात प्रथम



गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने विशेष निर्देशांकाच्या कामगिरी नुसार मार्च महिन्याच्या रँकिंगमध्ये १८३ पैकी १४८.८ गुण मिळवून कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.



                                                 

राज्यस्तरावरुन प्राप्त होणाऱ्या रँकिंगच्या धर्तीवर विविध पोर्टलवर सादर केलेल्या प्रगती अहवालानुसार आरोग्य सुविधा, वैद्यकीय सेवा, लसीकरण, कुटुंब नियोजन, रोग नियंत्रण, सामुदायिक सहभाग, आरोग्य शिक्षण आदी आरोग्य पोर्टल कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी नीलिमा धबाले यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व उपकेंद्रांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे आरोग्य केद्रांने कोल्हापूर जिल्हास्तरावर उज्वल यश संपादन केले आहे. यामुळे आरोग्य  केंद्रासह सर्व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र  कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.