गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी (ता: गडहिंग्लज) येथील श्री रामलिंग विकास सेवा संस्थेच्या नैमित्तिक (रिक्त) संचालकपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भिमाप्पा सिद्धाप्पा पुजेरी - धनगर यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमित गराडे यांनी काम पाहिले.
'भिमाप्पा' हे जिल्हा शेतकरी संघाचे संचालक जयकुमार मुन्नोळी यांचे विश्वासू मानले जातात. त्यांच्या निवडीने धनगर समाजातून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी जयकुमार मुन्नोळी यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमास चेअरमन पुंडलिक भोसले, व्हा.चेअरमन भागोजी गवळी,शिवशंकर हत्तरकी, के. के. पाटील, चंद्रकांत गुरुवानगोळ,हसन तशिलदार, हनिफ तशिलदार,अशोक पाटील, मारुती पाटील,विलासमती शेरवी,भाऊ काळोजी, सचिव विनोद वाईंगडे, काशिनाथ रवेदार, रामलिंग दुद्यागोळ, राजू मुन्नोळी, प्रसाद जोशी, अविनाश दुद्यागोळ, शिवकुमार संसुद्धी, आनंद मठपती, महादेव निर्वाणी आदी उपस्थित होते.

