Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संत गजानन फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज कॉलेज फार्मसी महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ उत्साहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून श्रुती सुंठनकर या उपस्थीत होत्या.




यावेळी विविध स्पर्धांमधे यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी फार्मसी महाविद्यालयातून सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून ज्ञानेश्वरी सलगर, सर्वोत्तम उपस्थिती रचेल फर्नांडिस तर शैक्षणिक उत्कृष्टते साठी श्रुतिका वाळकी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पदव्युत्तर विभागातील सर्वोत्तम विद्यार्थी योगिता सराफ तर शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी युवराज कुंभार यांना गौरवण्यात आले.



यावेळी ॲड बाळासाहेब चव्हाण, प्राचार्य डॉ. अन्सर पटेल डॉ. अजिंक्य चव्हाण, सह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रा.स्वप्निल हराळे यांनी  मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.