Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

‘रस्त्यावर नको पार्किंग, वाहतूकीची सुटेल कोंडी'

गडहिंग्लजमध्ये फुटबॉलपटूंनी केली वाहतुकीसाठी जनजागृती ; शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीग 





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गामुळे (हायवे) शहरात वाहतूकीचा प्रश्न जटील बनला आहे. या पार्श्वभुमीवर येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने संपुर्ण किटवर खेळाडूंची रॅली काढून वाहतूकीसाठी जनजागृती केली. ‘’मॉर्निग वॉकला हायवे टाळा’, ‘फुटपाथचा वापर सुरक्षितता अधिक’, ‘रस्त्यावर नको पार्किंग, वाहतूकीची सुटेल कोंडी’, ‘उजव्या बाजूने चाला’, ‘शिस्त पाळा, कोंडी टाळा’, ‘सुरक्षा प्रथम, गती शेवटी’ या खेळाडूंच्या घोषणांनी शहर परिसर दणाणून गेला. निमित्त होते शिवराज- युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लीग स्पर्धेतील खेळाडूंच्या रॅलीचे.



एम. आर. हायस्कूल पासून रॅलीला प्रारंभ झाला. सहा संघाचे ९० हून अधिक खेळाडू संपुर्ण किटसह रँलीत सहभागी झाले होते. प्रत्येकी दोन खेळाडूंची ओळ करून शिस्तबध्दपणे ही रॅली निघाली. फुगे, फलक आणि ध्वनीपेक्षकावरून फुटबॉलची गाणी लक्षवेधक ठरली. मुसळे टिकटी, बसवेश्वर पुतळामार्गे बाजारपेठेत हि रॅली पोहचली. रॅलीत डेव्हलपमेंट फुटबॉल लीगमधील सामन्यांची माहिती देण्यात येत होती. रॅलीतील खेळाडू वाहतूकीच्या सुरक्षिततचे घोषवाक्यांचे फलक घेऊन सहभागी होते. रॅलीचा मार्ग खासकरून हायवेवरील वाढलेले अपघात, मॉर्निग वॉकवेळी घ्यावयाची दक्षता बाबतच्या घोषणांनी खेळाडूंनी दणाणून सोडला. मॉर्निग वॉकसाठी हायवे टाळा ते उजव्या बाजूने चाला या मार्गदर्शक सुचना रस्त्याच्या दुतर्फा नागरिक कुतूहलाने ऐकत होते. नेहरू चौक, लक्ष्मी मंदिर रोड, नगरपालिका, दसरा चौक, टिळक पथ, आझाद रोड, चर्च रोडवरून एम. आर. हायस्कूलला रॅलीची रात्री साडेसात वाजता सांगता झाली. समन्वयक सुरज कोंडूस्कर, प्रसन्न प्रसादी आणि सहकाऱ्यांनी रॅलीचे नियोजन केले.




जोशपुर्ण सहभाग



डेव्हलपमेंन्ट फुटबॉल लीगमध्ये पंधरा ते एकोणीस वर्षाखालील खेळाडूंचा सहभाग आहे. दरवर्षी एखादा सामाजिक प्रश्न घेऊन सहभागी खेळाडूंची प्रबोधनात्मक रॅली काढली जाते. यापुर्वी पाण्याची बचत, पर्यावरण जपा, मैदानी खेळांची गरज, मोबाईलचा अतिरेक असे विषय रँलीत घेण्यात आले होते. वाहतुकीच्या रॅलीत खेळाडूंच्या जोशपुर्ण सहभागातील घोषणांनी वेगळाच रंग भरला. या घोषणा उपस्थितांच्या लक्ष वेधणाऱ्या ठरल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.