Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शौर्याच्या स्मृतीस्थळी तेजाचा दीप !

नेसरीत चौकातील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारकाजवळ हायमास्ट दिव्याचे उदघाटन




गडहिंग्लज (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय स्वराज्य स्थापनेत प्राणांची आहुती देणारे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या नेसरी (ता गडहिंग्लज ) येथील चौकात असणाऱ्या स्मृतीस्थळी माजी आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक नियोजन मधून हायमास्ट दिव्यासाठी एकूण ४.४१ लाख इतका निधी मंजूर केला होता.या कामाचे लोकार्पण आज माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.




यापूर्वी नेसरी येथील प्रतापराव गुजर स्मारकजवळ राजेश पाटील यानी आमदार फंडातून आशा प्रकारचा हायमास्ट दिव्यासाठी निधी मंजूर करून तेथील ऐतिहासिक स्थळ तेजोमय केले. त्याबद्दल नेसरी ग्रामस्थानी राजेश पाटील यांचे आभार मानले. नेसरी बस स्टॉप चौकातील हा केवळ प्रकाशस्तंभ नाही, तर स्वराज्याच्या तेजस्वी परंपरेला उजाळा देणारा श्रद्धेचा साक्षीदार आहे. रात्री हा पुतळा परिसर  उजळला. आता या ऐतिहासिक स्मारकाच्या व चौकाच्या सुरक्षिततेसाठी, सौंदर्यासाठी आणि इतिहासाशी नाते जोडण्यासाठी येथून पुढेही प्रयत्न करणार असल्याचे राजेश पाटील यानी यावेळी बोलताना सांगितले.



या कार्यक्रमासाठी नेसरी गावच्या सरपंच सौ. गिरिजादेवी शिंदे, मुन्नासो नाईकवाडी, अभयदादा देसाई, प्रताप पाटील,अमर हिडदुगी, शिवराज देसाई, रणजीत पाटील,संदीप शिंदे, दयानंद नाईक,दिनकर मेटकर,प्रकाश दळवी, किरण हिडदुगी, नेसरी ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामस्थ व भागातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.