गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील साधना प्रशालेत गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य आय. पी. कुटिन्हो यांनी केले.
यानिमित्ताने महर्षी व्यास मुनी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रशालेचे प्राचार्य श्री. कुटिन्हो व आर. सी. हिरेमठ यांनी केले.
सदर कार्यक्रम दरम्यान प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. अनन्या मिश्रकोटी, सुशिलकुमार पाटील, नितेश कांबळे, आराध्या कल्याणकर या विद्यार्थ्यांनी गुरूंचे महात्म्य मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन शितल भवारी यांनी केले. सूत्रसंचालन सौ. सुनिता नाईक यांनी केले तर आभार शीतल हरळीकर यांनी मानले. कार्यक्रमास पर्यवेक्षक अरविंद बारदेस्कर, ज्येष्ठ शिक्षक एस. एम. घोडके, पी. आर. बैरागी, अनिल देशमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

