गडहिंग्लज तालुक्यातील 89 ग्रामपंचायती ; बचत भवन येथे काढणार आरक्षण
कोल्हापूर : ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या सन 2025 ते 2030 या कालावधीकरिता आरक्षण सोडत सोमवार, दिनांक 21 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता काढण्यात येणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. इच्छुकांनी आरक्षणासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच आणि उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ (महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्र.२३ दि.१३ जून २०२५) अन्वये दि.५ मार्च २०२५ रोजीची अधिसूचना अधिक्रमीत करुन महाराष्ट्र शासनाद्वारे अधिसूचना राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी या अधिसूचनेव्दारे जिल्ह्यातील 1 हजार 26 ग्रामपंचायतींकरीता सरपंच पदापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण तसेच या प्रत्येक जाती, जमाती व प्रवर्गात मोडणा-या स्त्रिया व सर्वसाधारण स्त्रियांची पदे जिल्हानिहाय वाटप केली आहेत.
सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आलेला प्रवर्ग-
अनुसूचित जाती (महिलांसह)- 138 (त्यापैकी 69 महिलांकरीता)
अनुसूचित जमाती (महिलांसह) - 07 (त्यापैकी 4 महिलांकरीता)
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिलांसह) - 277 (त्यापैकी 139 महिलांकरीता)
सर्वसाधारण (महिलांसह) - 604 (त्यापैकी 302 महिलांकरीता)
7 जुलै 2025 रोजीच्या मार्गदर्शन पत्रानुसार दिनांक 5 मार्च 2025 रोजी प्रसिध्द केलेली अधिसूचना अधिक्रमीत करण्यात आली असल्याने दि.13 जून 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार सरपंच आरक्षणामध्ये कोणताही बदल होत नसला तरी नव्याने सरपंच आरक्षण सुनिश्चित करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार नव्याने सरपंच आरक्षणाबाबत कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 30 व मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील नियम (3) (4) (4अ) (5) (6) अन्वये प्राप्त अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाने दिनांक 13 जून 2025 अन्वये अधिसूचित केलेल्या आरक्षणानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीसाठी सोबत जोडले परिशिष्टानुसार, सरपंच पदाचे आरक्षण प्रमाण निश्चित करण्यात आले आहे.
पन्हाळा- ग्रा.पं. -111, अनुसूचित जाती- स.सा.8,स्त्री-8, अनुसूचित जमाती- स.सा.-0,स्त्री-0, नागरिकांचा मागास प्रवर्ग-स.सा.-15,स्त्री -15, सर्वसाधारण- स.सा.-32, स्त्री- 33
शाहूवाडी- ग्रा.पं. -106, अनुसूचित जाती- स.सा.- 6, स्त्री-7, अनुसूचित जमाती- स.सा.-1, स्त्री-0, नागरिकांचा मागास प्रवर्ग-स.सा.-14, स्त्री - 15, सर्वसाधारण- स.सा.- 32, स्त्री- 31
करवीर- ग्रा.पं. -118, अनुसूचित जाती- स.सा.9, स्त्री-10, अनुसूचित जमाती- स.सा.-1, स्त्री-0, नागरिकांचा मागास प्रवर्ग-स.सा.-16, स्त्री -16, सर्वसाधारण- स.सा.-33, स्त्री- 33
गगनबावडा- ग्रा.पं. -29, अनुसूचित जाती- स.सा.3, स्त्री-2, अनुसूचित जमाती- स.सा.-0, स्त्री-0, नागरिकांचा मागास प्रवर्ग-स.सा.-4, स्त्री -4, सर्वसाधारण- स.सा.-8, स्त्री- 8
कागल- ग्रा.पं. -83, अनुसूचित जाती- स.सा.6, स्त्री-6, अनुसूचित जमाती- स.सा.-0, स्त्री-0, नागरिकांचा मागास प्रवर्ग-स.सा.-11,स्त्री -11, सर्वसाधारण- स.सा.-25, स्त्री- 24
राधानगरी- ग्रा.पं. -98, अनुसूचित जाती- स.सा. 6, स्त्री-5, अनुसूचित जमाती- स.सा.-0, स्त्री-0, नागरिकांचा मागास प्रवर्ग-स.सा.-13, स्त्री -14, सर्वसाधारण- स.सा.-30, स्त्री- 30
हातकणंगले- ग्रा.पं. -61, अनुसूचित जाती- स.सा. 6, स्त्री-6, अनुसूचित जमाती- स.सा.-0, स्त्री-1, नागरिकांचा मागास प्रवर्ग-स.सा.-8, स्त्री -8, सर्वसाधारण- स.सा.-16, स्त्री- 16
शिरोळ- ग्रा.पं. -52, अनुसूचित जाती- स.सा. 5, स्त्री- 5, अनुसूचित जमाती- स.सा.-1, स्त्री-1, नागरिकांचा मागास प्रवर्ग-स.सा.-7, स्त्री -7, सर्वसाधारण- स.सा.- 13, स्त्री- 13
आजरा- ग्रा.पं. -73, अनुसूचित जाती- स.सा.-4, स्त्री -4, अनुसूचित जमाती- स.सा.-0, स्त्री-0, नागरिकांचा मागास प्रवर्ग-स.सा.-10,स्त्री -10, सर्वसाधारण- स.सा.-22, स्त्री- 23
भुदरगड- ग्रा.पं. -97, अनुसूचित जाती- स.सा.-5, स्त्री- 6, अनुसूचित जमाती- स.सा.-0, स्त्री-0, नागरिकांचा मागास प्रवर्ग-स.सा.-13, स्त्री -13, सर्वसाधारण- स.सा.-30, स्त्री- 30
गडहिंग्लज- ग्रा.पं. -89, अनुसूचित जाती- स.सा.-5, स्त्री -5, अनुसूचित जमाती- स.सा.-0, स्त्री-1, नागरिकांचा मागास प्रवर्ग-स.सा.-12, स्त्री -12, सर्वसाधारण- स.सा.-27, स्त्री- 27
चंदगड- ग्रा.पं. -109, अनुसूचित जाती- स.सा.-6, स्त्री- 5, अनुसूचित जमाती- स.सा.-0, स्त्री-1, नागरिकांचा मागास प्रवर्ग-स.सा.-15, स्त्री -14, सर्वसाधारण- स.सा.-34, स्त्री- 34
एकूण- ग्रा.पं. -1 हजार 26, अनुसूचित जाती- स.सा.- 69, स्त्री- 69, अनुसूचित जमाती- स.सा.-3, स्त्री-4, नागरिकांचा मागास प्रवर्ग-स.सा.-138, स्त्री -139, सर्वसाधारण- स.सा.-302, स्त्री- 302
निवडणूक नियम 1964 मधील 2 (अ) चे पोटनियम (4) व (6) मधील तरतूदीनुसार सरपंच पदे आरक्षीत करावयाची आहेत. आरक्षण काढणेकामी तहसिलदार यांनी निश्चित केलेल्या ठिकाणांचे नाव खालीलप्रमाणे आहेत.
करवीर - बहुउद्देशीय हॉल, रमणमाळा, कोल्हापूर
कागल - बहुउद्देशीय सभागृह, तहसिलदार कार्यालय, कागल
शाहूवाडी - पंचायत समिती सभागृह, शाहूवाडी
पन्हाळा - मयूर हॉल, नगरपरीषद, पन्हाळा
हातकणंगले - नवीन प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, हातकणंगले
शिरोळ - नवीन प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, शिरोळ
आजरा- नवीन प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, आजरा
चंदगड- प्रशासकीय इमारत, तहसिलदार कार्यालय, चंदगड
भुदरगड- पंचायत समिती भुदरगड, दिनकरराव जाधव सभागृह, गारगोटी
गडहिंग्लज- बचत भवन, पंचायत समिती, गडहिंग्लज
राधानगरी - राजर्षी शाहू सभागृह, पंचायत समिती, राधानगरी
गगनबावडा - तहसिलदार कार्यालय, गगनबावडा

