Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्यांनी हयात प्रमाणपत्रासाठी संजय गांधी योजना शाखेशी संपर्क साधावा

महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांचे आवाहन




कोल्हापूर : केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले हयातीचे प्रमाणपत्र (DLC) ऑनलाईन पद्धतीने Beneliciary Satyapan App च्या माध्यमातून तयार करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित तहसिलदार कार्यालयातील संजय गांधी योजना शाखेशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केले आहे.


इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेसाठी केंद्र शासनाने Beneliciary Satyapan App विकसित केले आहे. या ॲपद्वारे हयात प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट करून ते NSAP पोर्टलवर अपडेट करावे.


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, हयात असल्याचे प्रमाणपत्र दरवर्षी १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत सादर करणे आवश्यक असते. मात्र, नवीन ॲप सुरू झाल्यामुळे यावर्षी जुलै २०२५ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत हयात प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे वेतन अनुदान बंद करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.