Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साधना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सीए फाउंडेशन परीक्षेत यश

शुभम मापटे, अनुज घेवडे, सिद्धार्थ  पाटील, मृण्मयी कुलकर्णी यांचे अभिनंदन


       शुभम मापटे  अनुज घेवडे  सिद्धार्थ पाटील  मृण्मयी कुलकर्णी 


गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील साधना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सीए फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश मिळवले. 

 

सीए फाउंडेशन ही परीक्षा मे 2025 मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेत साधना महाविद्यालयाच्या शुभम शिवाजी मापटे (315 गुण), अनुज दीपक घेवडे(247), सिद्धार्थ रुद्राप्पा पाटील (203) यांनी यश मिळवले, तर मृण्मयी स्वप्निल कुलकर्णी हिने (CSEET) मध्ये यश मिळवले. या विद्यार्थ्यांना साधना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर, संस्थापक सचिव जे. बी. बारदेस्कर,  संचालक अरविंद बारदेस्कर, संचालिका फिलॉन बारदेस्कर, प्रभारी प्राचार्या वैशाली भिऊंगडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक यांचे साधना परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.