Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गिजवणे लक्ष्मी दूध संस्थेच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमणार

सहाय्यक निबंधक (दुग्ध) यांच्या लेखी पत्रानंतर दूध उत्पादक संघर्ष समितीचे ठिय्या आंदोलन मागे 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गिजवणे येथील श्री लक्ष्मी सहकारी दूध संस्थेतील मनमानी कारभाराविरोधात अखिल भारतीय किसान सभा दूध उत्पादक संघर्ष समितीने गेल्या तीन दिवसापासून गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर सुरू केलेले ठिय्या आंदोलन सकारात्मक चर्चेनंतर आज मागे घेतल्याची माहिती मुक्ती संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष संग्राम सावंत यांनी दिली. संस्थेचा अहवाल व म्हणणे कागदपत्रांसह आल्यानंतर चौकशी समिती नेमून चौकशी करण्याचे लेखी पत्र सहाय्यक निबंधक ( दुग्ध) यांनी संघटनेला दिले असून येत्या आठ दिवसात सभासदांना परिपूर्ण माहिती देण्याचे आदेश देखील त्यांनी संस्थेला दिल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले.



श्री लक्ष्मी दुध संस्थेच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचारा विरोधात चौकशी समिती नेमून सखोल चौकशी करण्यात यावी व दोषीवर  फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक संघर्ष समितीने दिनांक 14 जुलै रोजी संघर्ष मोर्चा काढून गडहिंग्लज प्रांत कार्यालयसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सहाय्यक निबंधक व दूध संस्थेचे पदाधिकारी आणि दूध उत्पादक संघर्ष समिती यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. याबाबतचे लेखी पत्र संघटनेला देण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज हे आंदोलन स्थगित करण्यात आले.



यावेळी संग्राम सावंत, दिग्विजय कुराडे, विनोद पाटील, ॲड. दशरथ दळवी, अरविंद बारदेस्कर, बाबासाहेब पाटील, विजय कांबळे यांची भाषणे झाली. सागर शिंदे, जनार्दन तोडकर, महांतेश बन्ने, ना कांबळे, दिगंबर विटेकरी, स्वप्निल कोरी, गणेश कळेकर, संकेत बरकाळे, नेताजी बरकाळे, विजय कडुकर, आप्पासाहेब कडुकर, संतोष माने यांच्यासह सर्व कार्यकर्ते, सभासद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.