Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावात उद्या गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मेळावा



गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुका ग्रामपंचायत कामगार संघटनेच्या (आयटक) वतीने गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मेळावा महागाव येथील पाच रस्ता येथील राधिका हॉलमध्ये शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केला आहे.

    


या मेळाव्यात शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर येथे भव्य मोर्चा साठी जाणेबाबत चर्चा, दहा महिन्याच्या फरकाबाबत चर्चा, सर्व कर्मचाऱ्यांना राहणीमाण भत्ता लागू करणेबाबत चर्चा, प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा करणे, कर्मचाऱ्यांना गटविकास अधिकारी (वर्ग १) यांच्या सहीने ओळखपत्र देणे बाबत चर्चा करणे, गडहिंग्लज तालुका नवीन कमिटी स्थापन करणेबाबत चर्चा केली जाणार आहे. 



यावेळी जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सम्राट मोरे, संघटनेचे राज्यसचिव कॉम्रेड भवन पाटील, चंदगड तालुका ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष परशराम जाधव, आजरा तालुका ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष अशोक गेंगे, राधानगरी तालुका सचिव दीपक कांबळे, भुदरगड तालुका अध्यक्ष अनिल जाकीनकिरे, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष सुरेश मायान्नावर, दिलीप परीट, सुरेश म्हकावे, रावजी कांबळे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कांबळे यांच्याकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.