Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुत्नाळ येथील श्री दुरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार व सरस्वती मूर्ती अनावरण सोहळा उत्साहात



गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुत्नाळ येथील श्री दुरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये फेब्रुवारी- मार्च 2025 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेतील तसेच चित्रकला, सामान्य ज्ञान, क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व सरस्वती मूर्ती अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी होते.



शाळेचे माजी विद्यार्थी ॲड. सुधाकर पाटील-भोपळे प्रमुख पाहुणे होते. प्रशालेच्या प्रांगणात सरस्वती मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष डॉ.सतीश घाळी यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण करण्यात आले.



हिटणी येथील माजी विद्यार्थी मल्लाप्पा मन्नाई यांनी चिरंजीव कै.संकेत याच्या स्मरणार्थ स्वखर्चाने संगमरवरी मूर्ती बसवली. यावेळी संस्थेच्यावतीने मन्नाई दांपत्याचा सत्कार करण्यात आला. ॲड. पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना नवनवीन बदलांचा स्वीकार करून सामाजिक भान ठेवून वर्तन करण्याचा सल्ला दिला.




यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहना चौगुले, नंदिनी कुरणे,धनश्री चनवीर,शितल चिगरी, पल्लवी हिरेमठ आदी विद्यार्थ्यांचा तसेच साताप्पा मलकान्नावर, शिवाजी अनावरे, बी.जी. कुंभार,श्रीरंग तांबे, उमेश सावंत, माजी प्राचार्य मनोहर गुलगुंजी, वैशाली कागवाडे, पार्वती पाटील यांचा सत्कार करण्यात आला.



स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी अनावरे यांनी केले तर राजेंद्र पाटील यांनी अतिथी परिचय केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास पुजारी व पार्वती पाटील यांनी केले. बी.जी.कुंभार यांनी आभार मानले.



यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तुरकर, सचिव बी.जी.भोसकी , आय.जी.फुटाणे, वाय.एम.कांबळे, सुरेश हुली, एस.एम.बागेवाडी, व 1983-84 बॅचचे माजी विद्यार्थी, पालक उपस्थित होते.







Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.