Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'खालीद का शिवाजी', चित्रपट गडहिंग्लजमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित न करण्याची शिंदे शिवसेनेची मागणी

प्रांताधिकारी यांना निवेदन देत याकडे वेधले लक्ष 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): 'खालीद का शिवाजी' हा चित्रपट गडहिंग्लजमधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित न करण्याची मागणी शिंदे शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.



'खालिद का शिवाजी' हा चित्रपट काही दिवसात महाराष्ट्राच्या अनेक चित्रपटगृहामध्ये रिलीज होणार आहे. त्याचे काही ट्रेलर दाखविले आहेत. त्यामध्ये छ. शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास दाखविला आहे, असे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी सांगितले आहे. मोडतोड करून इतिहास दाखविण्यात आला आहे. त्या निर्मित्याकडे पुरावे नसल्याने महाराष्ट्रामध्ये राज्यकीय पक्ष व हिंदुत्वादी संघटना यांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे वादग्रस्त व शिवप्रेमींची भावना दाखवल्यामुळे सदर चित्रपट गडहिंग्लज शहरातील दोन्ही चित्रपटगृहात रिलीज करून नयेत अशी मागणी या निवेदनातून केली आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चांगल्या प्रकारे दाखविला आहे, मात्र यातील काही वादग्रस्त दृश्य हटवून सदर चित्रपट प्रदर्शित करण्यास काहीच अडचण नाही, असेही या निवेदनात म्हटले आहे.


निवेदनावर संघटक काशिनाथ गडकरी, शहर प्रमुख अशोक शिंदे, शहर प्रमुख वसंत शेटके, तालुकाप्रमुख संजय संकपाळ, युवा सेना चंदगड विभाग प्रमुख सुदर्शन बाबर, युवासेना तालुका संघटक सागर कांबळे, युवासेना तालुकाप्रमुख विलास पाटील, शिवसेना महिला तालुकाप्रमुख स्नेहलता बाडकर, लक्ष्मण पाच्छापुरे, मुबारक मुल्ला आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.