Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तेरणी मराठी विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप



गडहिंग्लज (प्रतिनिधी):  मराठी विद्या मंदीर, तेरणी  (ता.गडहिंग्लज)  येथे  चंदगड विधानसभा मतदारसंघाचे  आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसा निमित्य शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी एकूण 246 संच देण्यात आले.



विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन व गुणवत्तेला वाव मिळावा या उद्देशाने आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे सर्व पालक व शिक्षक वर्गाने कौतुक केले. यासाठी आमदार पाटील यांच्या भाची आणि चंदगड विधानसभा महिला संयोजिका सौ. भारती जाधव यांनी सहकार्य केले.




यावेळी भाजपा सदस्य भरमा भोई, बूथ प्रमुख संतोष भोई,  युवा संघटक व संपर्कप्रमुख सुहास चव्हाण, किरण बुध, दुंडापा मलकानावर, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. गीता गोरे, सदस्य संतोष व्हनोळी, सविता हिरेमठ, मुख्याध्यापक शिवाजी पाटील, शिक्षक परशराम गायकवाड, श्रीकांत कलोळे, विजय पाटील, रमजान अंकली, श्री. करीमगोळ यांच्या पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सखरु भोसले यांनी प्रास्तविक तर कामाना नाईक यांनी आभार मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.