Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

थोरांची वचने आचरणात आणल्यास विद्यार्थी नक्कीच सुसंस्कारित होतील

शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र पाटील यांचे प्रतिपादन 


साधना प्रशालेतील पालक मेळाव्यात  संस्कार शिबिर व व्यसनमुक्तीवर व्याख्यान 




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी संतांचे विचार, थोरांची वचने आत्मसात करून आचरणात आणल्यास विद्यार्थी नक्कीच सुसंस्कारित होतील. यासाठी शिक्षक व पालक यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे  प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र पाटील यांनी केले.

 


मुख्यमंत्री गतिमान प्रशासन अभियान संस्कार शिबिर अंतर्गत, गडहिंग्लज विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र पाटील यांच्या उपस्थितीमध्ये साधना प्रशालेत पालक मेळावा 'व्यसनमुक्ती व विद्यार्थ्यांवरील संस्कार' हा उपक्रम उत्साहात पार पडला. सदर पालक मेळाव्यात प्रसिद्ध व्याख्याते  गणपत पाटोळे यांनी 'व्यसनमुक्ती प्रसार व प्रचार' या विषयावर व्याख्यान दिले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य  आय. पी. कुटिन्हो यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राचार्यांच्या हस्ते पार पडला. पाहुण्यांची ओळख पर्यवेक्षक  ए. जे. बारदेस्कर यांनी करून दिली.

 


प्रमुख पाहुणे विस्तार अधिकारी श्री. पाटील यांनी मौलिक मार्गदर्शन केले.  त्यांनी संस्कार शिबिराचा हेतू व उद्देश स्पष्ट केला. वक्ते श्री. पाटोळे यांनी पालक मेळाव्यात 'व्यसनमुक्ती' या विषयावर मनोगत व्यक्त करून पालकांना सजग राहण्याचा संदेश दिला. या व्याख्यानात त्यांनी व्यसन व व्यसनाचे प्रकार, शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये संभाव्य व्यसनांचे धोके, निरोगी शरीराचे महत्त्व, मानसिक व्यसन यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टीचे व्यसन करून सर्वोत्कृष्ट बनावे असे आवाहन त्यांनी केले.



सूत्रसंचालन  शितल भवारी यांनी केले. आभार  विनय नाईक यांनी मानले. कार्यक्रमास श्री. बेनके,  शितल हरळीकर, सतीश कांबळे, शिक्षक व पालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.