गडहिंग्लज (प्रतिनिधी): दुंडगे येथील सनी वाचनालय व सनी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्यामार्फत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी श्रमिक शिक्षण संस्थेचे सचिव श्री. सुरेश देसाई तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दत्ता देशपांडे उपस्थित होते.
व्यासपीठावर ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के.डी. धनवडे मंडळाचे अध्यक्ष भिमगोंडा पाटील होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जागृती हायस्कूलचे क्रीडा शिक्षक संपत सावंत व यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे समन्वयक अमोल देवगोंडा व उदय इंदुलकर ,संजय शेंडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्रमिक शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी गुरुवर्य मा.ना कुलकर्णी व सौ. सुशीला माधव कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले तर दीप प्रज्वलन शाळेचे मुख्याध्यापक डी.जी.दिवटे व माजी मुख्याध्यापक जी.एम.कोरी आणि मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. इयत्ता 8वी ते 10वी गट -22स्पर्धक होते.
त्यामधील विजेते अनुक्रमे खालील प्रमाणे - प्रथम क्रमांक वर्षांनी शिवानंद पाटील,द्वितीय संस्कृती सुनील हरगापुरे , तृतीय दिव्या प्रल्हाद जत्राटे, उत्तेजनार्थ प्रणाली अनिल कांबळे, माद्याळ (हे सर्व विद्यार्थी परिश्रम विद्यालय दुंडगे)
5वी ते 7वी गट -30 स्पर्धक -प्रथम क्र. विजयालक्ष्मी मलगोंडा पाटील, माद्याळ,द्वितीय क्र.-आलिया रियाज हलकर्णी,तृतीय क्र.-पूर्वा किरण धनवडे, दीप इंग्लिश दुंडगे, उत्तेजनार्थ-सनिधी शंकरगोंडा पाटील (मुत्नाळ) दीप इंग्लिश दुंडगे
स्पर्धेत एकूण 52 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या. पाचवी ते सातवीचा गट व आठवी ते दहावीचा गट होता.
स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य प्रशांत देसाई यांनी केले यानंतर सर्व मान्यवरांचा स्वागत प्र सत्कार करण्यात आला तर महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा एस आर रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. दत्ता देशपांडे सरांचा सत्कार शाल, श्रीफळ व मा.ना कुलकर्णी चरित्र ग्रंथ देऊन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उदय तेलवेवकर यांच्या हस्ते व पोलीसमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल अप्पासाहेब पाटील यांचा सत्कार सचिन ओहरा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. देशपांडे यांनी उपस्थित सर्व स्पर्धकांना व विद्यार्थ्यांना अतिशय मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी वाचनाचे महत्व, वक्तृत्व कला आत्मसात करण्याची गरज व शिक्षणाचे महत्व सविस्तरपणे व विविध उदाहरणाद्वारे सांगितले. विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे सांगितली. यानंतर संपत सावंत यांनी स्पर्धेचे नियम व अटी समजावून सांगितल्या व सुरेश देसाई यांनी मंडळाच्या सामाजिक ,शैक्षणिक उपक्रमाबाबत गौरवोद्गार काढले. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली आज स्पर्धेतून विजेत्यांना रोख बक्षीसे, प्रशस्तीपत्र व सोबत दिनकर खवरे लिखित पुस्तके भेट देण्यात आली.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठीचे नियोजन ग्रंथपाल सचिन ओहरा,संजय देसाई ,अरविंद पाटील, सतीश संकेश्वरी, सुरेश गुलगुंजी, सदाशिव खवरे, संदीप सोलापूरे, कपिल पाटील, अण्णाप्पा कोकणे व सुनील हरगापरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिनकर खवरे यांनी तर आभार दीप इंग्लिशचे मुख्याध्यापक अजित दावणे सर यांनी मानले.

