Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिद्दीच्या बळावर यश संपादन करता येते - डॉ.गंगाधर व्हसकोटी

पुणे येथे श्रीकृष्ण गवळी हणबर समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार




पुणे : जीवनामध्ये जिद्द ,चिकाटी यांच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते. समाजाची गरिबी दूर व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून कार्य करा. विद्यार्थ्यांच्या हितासाठी समाज आपल्या पाठीशी ठाम आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते, समाजरत्न डॉ. गंगाधर व्हसकोटी यांनी केले.



पुणे येथे श्रीकृष्ण गवळी हणबर समाजाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. बालचंद्र चौगुले म्हणाले, समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याने गुणवत्तेच्या जोरावर यश संपादन करावे. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वजण एकत्र या व समाजाची एकजूट ठेवा.



यावेळी डॉ गंगाधर व्हसकोटी यांच्या हस्ते इयत्ता दहावी, बारावी, पदवी, क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भीमसेन भेंडीगिरी, नारायण गावडे, नागेश पाटील ,राजगोंडा चौगुले, ज्ञानेश्वर गावडे, राजू पुजारी, संतोष करडी, सुनील शिरगावी, शरद करनूरे, शंकर भिमांनावर, नंदा पाटील, गौरी चांदेकर, शितल चौगुले, आजी माजी सैनिक संघटना उपाध्यक्ष नागेश सासगिरी, अजित पाटील यांच्यासह समाज बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.