Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लायन्स क्लब ऑफ गडहिंग्लज रॉयलचा पदग्रहण सोहळा उत्साहात



गडहिंग्लज (प्रतिनिधी): लायन्स क्लब ऑफ गडहिंग्लज रॉयलच्या सन २०२६–२७ या लायनिस्टिक वर्षाच्या नूतन कार्यकारिणीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा शुक्रवार, दि. १० जुलै रोजी सायंकाळी गडहिंग्लज येथील आयएमए हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या सोहळ्याचे प्रमुख अतिथी लायन्स बहुप्रांत परिषद अध्यक्ष लायन भरत बलघट यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी लायनिझमची सेवा, नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कार्य याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी सन २०२६–२७ या वर्षासाठी लायन सुभाष चोथे यांनी अध्यक्ष, लायन डॉ. कल्याणी खोराटे यांनी सचिव, लायन मनोहर गुरबे यांनी खजिनदार, तर लायन शैलेंद्र कावनेकर यांनी उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.

क्लबमध्ये नव्याने दाखल झालेल्या सदस्यांना माजी प्रांतपाल लायन सुनील सुतार यांनी लायन्सची शपथ दिली. प्रांत ३२३४ डी-१ चे प्रथम उपप्रांतपाल व क्लबचे संस्थापक लायन डॉ. किरण खोराटे यांनी आपल्या मनोगतात लायन्स चळवळीतील सेवाकार्याचे महत्त्व अधोरेखित करत नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या .

यापूर्वी सकाळी बहुप्रांताचे अध्यक्ष लायन भरत बलघट यांच्या हस्ते वडरगे रोड येथील केडीसी कॉलनीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास गडहिंग्लज, इचलकरंजी, कोल्हापूर, कुरुंदवाड, हुपरी, महागाव आदी ठिकाणांहून मोठ्या संख्येने लायन्स सदस्य उपस्थित होते. माजी प्रांतपाल विजयकुमार राठी, रिजन चेअरमन लायन मनोहर बालर, झोन चेअरमन लायन डॉ. योगेश वाले, क्लबचे ॲडमिनिस्ट्रेटर रफिक पटेल, लायन सुरेश कोळकी व लायन आर. के. बांद्रे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले व सूत्रसंचलन रफिक पटेल यांनी केले.



यावेळी लायन  कौसरअली मुल्लानी डॉ. पट्टणशेट्टी, डॉ. संकेश्वरी, डॉ. राजश्री पट्टणशेट्टी, डॉ. सदानंद पाटणे, डॉ.सी.आर.देसाई,जितेंद्र शहा, अभिजीत, नायकवडी,बाबुराव रेडेकर, संतोष तेलंग, प्रा. आरबोळे, श्रीनिवास वेर्णेकर, दीपक मांगले, अभिषेक गाडवी, ॲड. फगरे, सचिन शिंदे, राकेश सासणे, संजू मोहिते, वीरुपाक्ष  पाटणे, बाबुराव रेडकर, प्रकाश चोथे, प्रसाद सभासद, प्रवीण कापसे, अर्जुन सावेकर, खटावकर तसेच उपस्थित सर्व लायन्स बंधू-भगिनींनी नूतन कार्यकारिणीचा सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव केला.

संपूर्ण कार्यक्रम उत्साह, शिस्त आणि सेवाभावाच्या वातावरणात पार पडला. आगामी वर्षात विविध सामाजिक, आरोग्य, पर्यावरण व मानवसेवेचे उपक्रम राबविण्याचा निर्धार नूतन कार्यकारिणीने यावेळी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.